मराठा आरक्षणाच्या आद्यादेशाचा रक्तदान शिबिराचे आयोजन करून आनंदोत्सव साजरा.
रक्तदानाबाबत समाजात जनजाग्रुती व्हावी हा यामागचा उद्देश – सरपंच पंकज बाबी गाडे
कापूरहोळ : मनोज जरांगे पाटील यांच्या पुढाकाराने मराठा समाजाला आरक्षण मिळाले म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साखर, पेढे व घोषणा देत रॅली काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. परंतु भोर तालुक्यातील कापूरहोळ येथे जरा वेगळ्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गुरुवार (दि.१ फेब्रुवारी) रोजी कापूरहोळ(ता.भोर) येथे विर धाराऊ माता गाडे पाटील वाडा शंभुतिर्थ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ८ वाजता कापूरहोळ गावचे सरपंच पंकज बाबी गाडे यांच्या हस्ते विर धाराऊ माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यांनतर अक्षय ब्लड बँक, हडपसर यांच्या वतीने सागर लोखरे आणि पदाधिकारी यांच्या सहकार्याने या शिबिरास सुरुवात झाली. सदर कार्यक्रमास सीमाताई तनपुरे(अखिल भारतीय मराठा महासंघ,भोर तालुका अध्यक्ष)यांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या. २०२४ ह्या चालू वर्षातील कापूरहोळ येथील हे पहीले रक्तदान अभियान असून लोकांमधे रक्तदानाबाबत जनजाग्रुती व्हावी या हेतूने हे रक्तदान शिबिर आयोजित केले असल्याचे सरपंच पंकज बाबी गाडे यांनी सांगितले.
कापूरहोळ(ता.भोर) येथे पार पडलेल्या रक्तदान शिबिरात १४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरास विशेषतः मारुती गाडे(सरपंच, हरिश्चंद्री), नवनाथ गाडे(उपसरपंच, हरिश्चंद्री), निलेश पांगारे(सरपंच, दिवळे), सचिन तनपुरे(सरपंच, धांगवडी), प्रविण देवघरे(कापूरहोळ, पंचक्रोशी वरकरी संस्था), सागर पांगारकर(सरपंच, मोहरी), अक्षय मालुसरे(सरपंच, कासूर्डी गु.मा.), प्रज्वत कदम(शिव सम्राज प्रतिष्ठान नसरापूर), माऊली दादा बदक(अखिल भारतीय मराठा महासंघ,भोर तालुका उपाध्यक्ष) व परिसरातील ग्रामस्थ व युवा सहकारी उपस्थित होते.
तसेच या शिबिरास विर धाराऊ माता मित्र मंडळ शंभुतीर्थ कापूरहोळ, जय हनुमान तरुण मंडळ हरिश्चंद्री, शिव साम्राज्य प्रतिष्ठान नसरापूर, शिवशक्ती मित्र मंडळ केतकावळे, देऊळजाई मित्र मंडळ दिवळे, समस्त ग्रामस्थ मंडळ निगडे, समस्त ग्रामस्थ मंडळ धांगवडी, समस्त ग्रामस्थ मंडळ कासुर्डी(गु.मा.), समस्त ग्रामस्थ मंडळ मोहरी(गु.मा.), समस्त ग्रामस्थ मंडळ उंबरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर आयोजित रक्तदान शिबीर व त्या माध्यमातून होत असलेली जनहितार्थ मदत याचे उपस्थितांनी कौतुक केले.