पुणे-सातारा महामार्गावर किकवी गावच्या हद्दीत भरधाव वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्ती जागीच ठार

किकवी : पुणे-सातारा महामार्गावर किकवी गावच्या हद्दीत कोहीनूर हॉटेल अँड बार समोर पुण्यावरून कोल्हापूरच्या दिशेने जात असणाऱ्या महींद्रा कंपनीच्या कार ने (एम एच १४ एल ए ९२२१) धडक दिल्याने अनोळखी पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (१ फेब्रुवारी) रात्री ९:३० च्या सुमारास घडली आहे. राजगड पोलीस ठाण्यात याबाबत वाहन चालक विक्रांत आनंद कदम (वय ४० वर्षे, रा. दत्तनगर, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील मयत पुरुषाचे अंदाजे वय ५०-५५ वर्षे असून अद्याप पर्यंत या पुरुषाची ओळख पटू शकली नाही. याबाबत पोलीस अंमलदार योगेश लक्ष्मण राजीवडे यांनी राजगड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.

Advertisement

सदर घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस व महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. राजगड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह भोर उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला. या व्यक्तीच्या अंगावर राखाडी रंगाची पॅन्ट व पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट आहे. आजूबाजूच्या परिसरातील या ५०-५५ वयोगटातील कुणी व्यक्ती बेपत्ता असल्यास नातेवाईकांनी राजगड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे अवाहन राजगड पोलिस स्टेशनचे पोलीस अंमलदार राजेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page