सारोळा येथून वृद्ध महिला बेपत्ता
सारोळा : भोर तालुक्यातील सारोळा येथून एक वृध्द महिला बेपत्ता झाली आहे. याबाबत राजगड पोलीस स्टेशन येथे महिला हरवल्याची तक्रार नोंदवली गेली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमसाद बशीर शेख (वय ७५ वर्षे) या दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुलांना सारोळा येथे बसमध्ये बसुन देते असे सांगुन घरातून निघुन गेल्या आहेत. याबाबत नाजिम बशीर शेख यांनी शमसाद शेख यांचा इतरत्र शोध घेतला असता त्यांचा काहीच पत्ता न लागल्यामुळे अखेर राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किकवी चौकी येथे त्यांनी आज शुक्रवार (८ डिसेंबर) हरवल्याची तक्रार नोंदवली आहे.
सदर महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे
उंची ५ फुट, रंग सावळा, घरातून बाहेर पडताना अंगावर काळ्या रंगाचा ब्लाऊज व चॉकलेटी रंगाची साडी.
वरील वर्णनाची महिला कोणाला दिसल्यास वा आढळून आल्यास राजगड पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस अंमलदार गणेश लडकत यांनी केले आहे.