पुणे सातारा महामार्गावरील राजगड साखर कारखाण्यालगत असणाऱ्या हॉटेल समोर ट्रक ने घेतला पेट; लाखोंचे नुकसान
कापूरहोळ : पुणे सातारा महामार्गा वरील राजगड साखर कारखाण्यालगत असणाऱ्या राजस्थानी हॉटेल, निगडे (ता. भोर, जि. पुणे) गावा जवळ एका ट्रकला आज गुरुवार (१४ डिसेंबर )आग लागली आहे. या आगीत ट्रक मधील सर्व जुने संगणक, लॅपटॉप व मटेरियल सध्या जळत आहे. मोठ्या प्रमाणावर आकाशात धुराचे लोट उधळले आहेत. पुण्यावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या या ट्रक ने महामार्गावर पेट घेतला आहे. सुदैवाने यामधे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ट्रक मध्ये असणाऱ्या मटेरियल मधील बॅटरी च्या शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचे समजले आहे. या घटनेची माहिती मिळताच त्वरित राजगड पोलीस व महामार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्नीशमन दल आग विझवण्यासाठी बोलवले असल्याचे राजगड पोलिसांनी यावेळेस सांगितले. या आगीत ट्रक मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.