घड्याळ आणि राष्ट्रवादी अजितदादांकडे; निवडणूक आयोगाचा निर्णय

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : उद्धव ठाकरेंप्रमाणेच शरद पवारांनाही आता चिन्ह आणि पक्षाचे नाव गमवावे लागले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घड्याळ हे चिन्ह आता अजित पवार यांना देण्यात आले आहे.

आता शरद पवार यांना आपल्या पक्षासाठी नवे नाव आणि चिन्ह यांची यादी द्यावी लागणार आहे. त्यातून त्यांना नाव आणि चिन्ह मिळू शकेल. पण जर त्यांनी तसे नाव व चिन्ह न दिल्यास ते अपक्ष म्हणून गणले जातील, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

अजित पवार यांनी हा निर्णय आपण नम्रपणे स्वीकारतो असे म्हणत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ठिकठिकाणी अजित पवार यांच्या समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून जल्लोष सुरू झाला आहे. आगामी राज्यसभा निवडणुका किंवा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या निर्णयाला महत्त्व आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्ह आणि पक्षाच्या बाबतीत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू होती. स्वतः शरद पवारही या सुनावणीसाठी हजर राहात होते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षाप्रमाणेच राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवाराना मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता.

उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून एकनाथ शिंदे आणि ४० आमदार वेगळे झाल्यानंतर तिथेही निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांनाच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचीही स्थिती झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page