भोर तालुक्यातील वीस गाव खोऱ्यामध्ये भाजपा भोर विधानसभा प्रमुख किरण दगडे यांचा गावभेट दौरा…विविध विकास कामांचे उद्घाटन…

भोर : भाजपा भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील यांचा रविवार (दि.१५) रोजी भोर तालुक्यातील वीस गाव खोऱ्यामध्ये गावभेट संवाद दौरा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या दौऱ्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या अडी अडचणी समजावून घेण्यात आल्या. व भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विकासकामांचे उदघाटन या वेळी करण्यात आले या वेळी भाबवडी ग्रामपंचायत मध्ये नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून 20 लक्ष रुपये रकमेच्या रस्ते काँक्रीटीकरण व बंदिस्त गटर या विकास कामाचे उदघाटन करण्यात आले.या उदघाटन प्रसंगी या भागात राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून भरगोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन किरण दगडे पाटील यांनी दिले. या संपूर्ण दौऱ्याचे आयोजन भोर तालुका युवा मोर्चा चे अध्यक्ष अमरदादा बुदगुडे यांच्या तर्फे करण्यात आले होते या वेळी उत्रोली,वडगाव डाळ,भाबवडी,खानापूर,जेधेवाडी,नेरे,अंबाडे,पळसोशी,वरोडी,पाले,धावडी,बाजारवाडी,हातनोशी या गावांना भेटी देण्यात आल्या व गावांमधील विविध विकास कामांची निवेदने स्वीकारण्यात अली. यावेळी भोर तालुका भाजप युवा मोर्चा चे अध्यक्ष अमरदादा बुदगुडे, अध्यक्ष जीवन अप्पा कोंडे,जिल्हा नियोजन चे माजी सदस्य बाळासाहेब गरुड, भोर तालुका सरचिटणीस दत्तात्रय नवघणे,मुळशी तालुका अध्यक्ष राजाभाऊ वाघ,पुणे जिल्हा उपाध्यक्ष विनायक ठोंबरे,ओंकार गोरड,महेश तांगडे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page