मुळशीत आदिवासी विद्यार्थ्यांना सहयोग फाउंडेशन च्या वतीने सायकल व पुस्तके वाटप
मुळशी प्रतिनिधी : सहयोग फाउंडेशन यमुनानगर, निगडी (मुळशी) यांच्याकडून आदिवासी विद्यार्थ्यांना एकूण दहा सायकल वाटप करण्यात आले. तसेच नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे संचालित, माध्यमिक विद्यालय कोळावडे (ता.मुळशी जि.पुणे) या विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी ५० पुस्तके भेट देण्यात आले.
यावेळी विविध प्रकारच्या स्पर्धांमधील बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महादेव कोंढरे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सहयोग फाउंडेशन चे नंदकुमार कुलकर्णी, मॉडर्न हायस्कूल गणेशखिंड चे दिनेश कुलकर्णी, प्रकाश साकोरे, आदित्य कुलकर्णी, अशोकराव वाळके पाटील, गिरीश देशमुख, डॉ संजीव संभूत व आनंद पोरे उपस्थित होते.
यावेळी मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब कोंढरे, कोळावडे गावाचे सरपंच अंकुश उभे, दत्ता उभे, सयाजी आढाव, प्रभारी सरपंच रुपाली शिंदे उपस्थित होते. तसेच यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी ,पालक , ग्रामस्थ उपस्थित होते.