ससूनमधून पुन्हा आरोपी पळाला! शरद मोहोळ यांच्या पत्नीला दिली होती धमकी

पुणे : पुण्याच्या ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॉर्ड क्रमांक १६ मधून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून गेला होता. यानंतर ससून रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या घटनेत राज्य सरकारमधील शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप कॉंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. यामुळे राज्य सरकारच्या मंत्र्यांवरही मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा असा प्रकार समोर आला आहे. आणखी एक आरोपी ससून रुग्णालयातून पलायन करण्यास यशस्वी ठरला आहे.

Advertisement

मार्शल लीलाकर असे ससून मधून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. शरद मोहोळ यांच्या पत्नीला धमकावल्याप्रकरणी हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान ससून रुग्णालयात असताना त्याने पोबारा केला आहे. आता याच्या पलायनामागे कोण आहे? याचा तपास घेतला जात आहे. मार्शल लीलाकरने सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ यांची पत्नी स्वाती मोहोळला धमकावले होते. याप्रकरणी पोलिसांनी लीलाकारला अटक केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page