मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला ९ फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण झाले; मात्र अद्याप सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने शनिवार(दि.१० फेब्रुवारी) पासून पुन्हा एकदा मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी मागील महिन्यातच लाखोंच्या संख्येने मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला होता; मात्र हा मोर्चा वाशीपर्यंत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याने त्यांचा मोर्चा विसर्जित झाला; मात्र आता दोन आठवड्यानंतर जरांगे-पाटील पुन्हा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

अध्यादेशाची अंमलबजावणी नाहीच

Advertisement

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून कायदा करण्याच्या मागणीसाठी जरांगे-पाटील हे उपोणाला बसले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला ९ फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण झाले; मात्र अद्याप सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने शनिवारपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा जरांगेंनी दिला आहे.

आमचा प्रश्न सुटला नाही- मनोज जरांगे-पाटील

मनोज जरांगे म्हणाले, सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही. आमचा प्रश्न सुटला नाही. आता १५ फेब्रुवारीपासून अधिवेशन आहे. परंतु, राज्य सरकारकडून पुन्हा तसा दगाफटका झाला, तर माझ्या समाजाला ते परवडणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page