स्वराज्यभूमी प्रतिष्ठान यांच्या वतीने उद्या भाटघर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
भोर : स्वराज्यभूमी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत श्री गणेश तरुण मंडळ भाटघर व श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तान यांच्या वतीने भाटघर (ता.भोर, जि.पुणे) येथे उद्या रविवार (दि. ७ जानेवारी) रोजी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. स्वराज्यभूमी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही संघटना कायम सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रम राबवत असते. त्यामधे गडकिल्ले संवर्धन, क्रीडाक्षेत्रातील मैदानी खेळ, शालेय विद्यार्थ्यांना मदत, विरघळी संवर्धन तसेच स्वराज्यभूमी प्रतिष्ठानने करोना काळात गरजूंना आर्थिक मदत आणि पावसाळ्यामध्ये पूरग्रस्तांना कोकणामध्ये केलेली मदत हे प्रतिष्ठानचे कार्य खरे तर अधोरेखित करण्यासारखे आहे. रक्तदान शिबिर घेऊन गरजू लोकांपर्यंत मोफत रक्त पोहोचवणे हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेऊन स्वराज्यभूमी प्रतिष्ठानने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
भाटघर (ता.भोर, जि.पुणे) येथे उद्या आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात स्वराज्यभूमी प्रतिष्ठान यांच्या वतीने रक्तसंकलनासाठी टीम उपस्थित राहणार आहे. निरोगी आयुष्यासाठी रक्तदान करा. कोलेस्ट्रोल कमी होते, रक्ताभिसरणाचा वेग वाढतो. रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रणात रहाते. रक्तदानानंतर तिन महिन्यांनी पुन्हा रक्तदान करता येते. यासारखे फायदे रक्तदानातून होतात त्याचबरोबर आपल्या रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचवण्यात मोलाचे योगदान राहते त्यासाठी भोर तालुक्यातील रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये रक्तदानासाठी सहभागी व्हावे असे आवाहन स्वराज्यभूमी प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे.