कॉंग्रेसला हाताचा पंजा कसा मिळाला? वाचा सविस्तर

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : १९५२ साली स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक झाली. सगळ्यांना वाटले कॉंग्रेस आपल्या चरखा या चिन्हावर निवडणूक लढवेल. स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींच्या आंदोलनामुळे चरखा घराघरात पोहचला होता. याचा फायदा नेहरू नक्की उचलतील अशी सगळ्यांना अपेक्षा होती पण त्यांनी आपल्या पक्षाचं चिन्ह बैलजोडी निवडली.

या आधी त्यांनी बैलजोडी आणि नांगर हे चिन्ह मागितलेले होते पण नांगर या चिन्हावरून वाद झाला आणि अखेर कॉंग्रेसने आपल्या पारंपारिक शेतकरी मतदाराला कनेक्ट करण्यासाठी बैलजोडी निवडली. तिथून पुढे जवळपास वीस वर्ष कॉंग्रेसने याच चिन्हावर निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. साधारण १९६६ मध्ये स्वर्गीय नेहरूंची पॉप्युलॅरिटी कॅश करून निवडणूक जिंकावी म्हणून त्यांच्या गुंगी गुडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोरीला म्हणजेच इंदिरा गांधीना कॉंग्रेस श्रेष्ठीनी पंतप्रधान बनवले. पण काहीच वर्षात त्याचं आणि कॉंग्रेस श्रेष्ठींशी बिनसले.

इंदिराजींनी स्वतःचा कॉंग्रेस पक्ष स्थापन केला त्याच नाव कॉंग्रेस (आर) ठेवले. निवडणुकीवेळी या दोन्ही पक्षामध्ये चिन्हावरून वाद झाले. अखेर जुन्या कॉंग्रेसला बैलजोडी हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळाली तर इंदिरा गांधीनी आपले चिन्ह म्हणून वासराला दुध पाजणारी गाय निवडली. अतिशय विचार करून निवडलेल हे चिन्ह होतं. आपलीच कॉंग्रेस खरी हे पटवण्यात इंदिरा गांधी यशस्वी ठरल्या आणि चिन्ह बदलूनही त्यांनी १९७१ च्या निवडणुकीत भरघोस यश मिळवले.

१९७७ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रचंड मोठा पराभव झाला. स्वतः इंदिरा गांधी रायबरेली इथून पडल्या. कॉंग्रेसमध्ये परत फुट पडली. इंदिरा गांधी यांच्या पक्षाला आय कॉंग्रेसं म्हणून ओळखले जाऊ लागले.

Advertisement

असं म्हणतात, पराभवामुळे हताश झालेल्या इंदिरा गांधी अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी शंकराचार्य चन्द्रशेखर स्वामी यांच्या जवळ पोहचल्या. त्यावेळी मौनात असणाऱ्या स्वामींनी त्यांना आशीर्वादासाठी हात वर केला. इंदिरा गांधीना हा आशीर्वादाचा हात कायमचा लक्षात राहिला.याच काळात आंध्रप्रदेश वगैरे राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. यावेळी निवडणूक आयोगाने आय कॉंग्रेसला गाय-वासरू या चिन्हा ऐवजी नवीन चिन्ह निवडण्यास सांगितले. त्यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ मंत्री बुटासिंग यांनी आंध्रमध्ये प्रचार दौऱ्यावर असणाऱ्या इंदिरा गांधीना फोन केला. त्यांनी सांगितलं आयोगाने कॉंग्रेसला हत्ती, सायकल आणि हात या पैकी एक चिन्ह निवडण्यास सांगितलं आहे. त्यांनी तसं बुटासिंगना फोन वर सांगितलं. पण लाईन मध्ये गडबड असल्यामुळे बुटासिंगना वाटलं की हत्ती. ते फोन वर “हाथी हाथी” असं म्हणू लागले. इंदिराजींना कळेना की आता याला कसे समजावू. तेव्हा शेजारी असणाऱ्या पीव्ही नरसिंहराव यांनी फोन घेतला आणि बुटासिंगना स्पष्ट शब्दात सांगितलं, “हमारा चिन्ह होगा हात का पंजा !!”. बुटासिंग यांच्या गडबडीमुळे कॉंग्रेसचे चिन्ह हत्ती झाले असते. पण नरसिंहराव यांच्यामुळे कॉंग्रेसला हात मिळाला. याच चिन्हाच्या जोरावर कॉंग्रेसने आणि इंदिरा गांधीनी राजकारणात जोरदार कमबॅक केले. तेव्हा पासून आजपर्यंत कॉंग्रेसचे निवडणूक चिन्ह पंजा हेच आहे.

याच काळात आंध्रप्रदेश वगैरे राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. यावेळी निवडणूक आयोगाने आय कॉंग्रेसला गाय-वासरू या चिन्हा ऐवजी नवीन चिन्ह निवडण्यास सांगितले. त्यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ मंत्री बुटासिंग यांनी आंध्रमध्ये प्रचार दौऱ्यावर असणाऱ्या इंदिरा गांधीना फोन केला. त्यांनी सांगितलं आयोगाने कॉंग्रेसला हत्ती, सायकल आणि हात या पैकी एक चिन्ह निवडण्यास सांगितलं आहे. त्यांनी तसं बुटासिंगना फोन वर सांगितलं. पण लाईन मध्ये गडबड असल्यामुळे बुटासिंगना वाटलं की हत्ती. ते फोन वर “हाथी हाथी” असं म्हणू लागले. इंदिराजींना कळेना की आता यांना कसे समजावू. तेव्हा शेजारी असणाऱ्या पीव्ही नरसिंहराव यांनी फोन घेतला आणि बुटासिंगना स्पष्ट शब्दात सांगितलं, “हमारा चिन्ह होगा हात का पंजा !!”. बुटासिंग यांच्या गडबडीमुळे कॉंग्रेसचे चिन्ह हत्ती झाले असते. पण नरसिंहराव यांच्यामुळे कॉंग्रेसला हात मिळाला. याच चिन्हाच्या जोरावर कॉंग्रेसने आणि इंदिरा गांधीनी राजकारणात जोरदार कमबॅक केले. तेव्हा पासून आजपर्यंत कॉंग्रेसचे निवडणूक चिन्ह पंजा हेच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page