भोर तालुक्यातील जांभळी येथील युवकांचे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला एक दिवस लाक्षणिक उपोषण करून जाहीर पाठिंबा
नसरापूर : भोर तालुक्यातील बऱ्याच गावांमधून राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तालुक्यातील अनेक गावातून मराठा आरक्षण संदर्भात साखळी उपोषणासह वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन सुरू आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून सकल मराठा समाज व जांभळी (ता.भोर)गावातील युवकांच्या वतीने रविवार (दि.२९ऑक्टोबर) रोजी जांभळी बस स्थानकावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला आहे तसेच सर्वपक्षिय राजकीय नेत्यांना यानिमित्ताने गावात बंदी घालण्यात आली. यावेळी संदीप अलगुडे, विकास आंबवले, शंकर कोळपे,महेश कोळपे, नवनाथ अलगुडे आणि बहुसंख्य तरुण उपस्थित होते.