भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून योगदान द्या:-मा.आमदार जगदीश मुळीक.अल्पसंख्यांक मोर्चाचा महाविजय स्नेहसंवाद कार्यक्रम संपन्न

पुणे (प्रतिनिधी):- देशाच्या आणि राज्याच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये अल्पसंख्यांकांचे सिख बांधवांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अल्पसंख्याकांच्या विकासासाठी महत्त्वकांक्षी धोरण व योजना राबवत त्यांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करत जनकल्याणार्थ योजना प्रभावीपणे तळागाळात राबवल्या आहेत. महा विजय २०२४ या पर्वामध्ये अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेतेमंडळी यांनी सहभागी होऊन या महाविजय पर्व २०२४ मध्ये योगदान देऊनपुन्हा एकदा पंतप्रधान  नरेंद्र मोदी तथा भारतीय जनता पक्षाच्या  पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहूया असे आवाहन मा. आमदार जगदीश मुळीक यांनी केले आहे. भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सिख प्रकोष्ठ  महाविजय २०२४ स्नेहसंवादाचा पुण्यामध्ये नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी मा आमदार जगदीश मुळीक बोलत होते.

Advertisement

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे मा. आमदार तथा पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे मा.अध्यक्ष जगदीश मुळीक, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा संयोजिका माधुरी गिरमकर, नेते दिलीपराव गिरमकर, पुणे जिल्हा व्यापारी आघाडी सेलचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. शैलेश चोबे, प्रधानमंत्री योजनेचे महासचिव
सृष्टी कुमार, अल्पसंख्यांक मोर्चाचे सिखचे भारतीय जनता पक्षाचे सिख प्रदेशाध्यक्ष जसप्रीतसिंग सलूजा, उपाध्यक्ष चरण सिंग सेठी, न्यू पुना क्लबचे प्रेसिडेंट अजित सिंग राजपाल व अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे सिख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सीख प्रमुख जसप्रीत सिंग सलोजा यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष चरणसिंग सेठी यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाच्या सीखसह प्रमुखपदी अजितसिंह राजपाल यांना नियुक्तीपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांचा गौरव करत त्यांना याप्रसंगी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page