भोर तालुक्यातील शिवरे येथून तीस वर्षीय युवक बेपत्ता
नसरापूर : भोर तालुक्यातील शिवरे येथील एक तीस वर्षीय युवक बेपत्ता झाला असल्याची घटना घडली आहे. वैभव कृष्णकांत डिंबळे असे या युवकाचे नाव आहे. बुधवारी(दि. ११ सप्टेंबर) सकाळी ११ वाजन्याच्या सुमारास वैभव हा हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची काळ्या रंगाची मोटर सायकल(एम.एच.१२ ए.के. ४१५३) घेऊन पुण्याला गणपती बघण्यासाठी जातो असे सांगुन घरातुन निघुन गेला आहे. त्यानंतर तो रात्री घरी येईल असे वाटले परंतु तो काही घरी आला नसल्याने अखेर वैभवचे वडील कृष्णकांत दशरथ डिंबळे(वय ६४ वर्ष, रा. शिवरे, ता. भोर) यांनी राजगड पोलिस स्टेशन कडे धाव घेतली. त्यांनी आज शुक्रवारी(दि. १३ सप्टेंबर) दुपारी वैभव हरवल्याची तक्रार राजगड पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे.
वैभव चे वर्णन खालीलप्रमाणे :
रंग गोरा, डोळे मोठे, चेहऱ्यावर दाढी, बारीक मिशी, उजव्या डोळयाच्या बाजुला देवीचा व्रण असलेला खड्डा, अंगात पांढ-या रंगाचा शर्ट, त्यावर निळया लाईनचा चेक्स, खाली गैर रंगाची पॅन्ट, पायात पेरेगॉन कंपनीची काळ्या रंगाची बंदाची चप्पल, उजव्या हातात राखी बांधलेली असून सोबत काळया रंगाची सॅग तसेच सोबत हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची काळ्या रंगाची मोटर सायकल(एम.एच.१२ ए.के. ४१५३).
वरील वर्णनाच्या युवक कोणाला दिसल्यास वा आढळून आल्यास राजगड पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस अंमलदार बर्कले यांनी केले आहे.