मनोज जरांगे पाटलांची तोफ १९ नोव्हेंबर रोजी भोरमधे धडाडणार; भोर मध्ये “न भूतो न भविष्यती” अशी सभा होणार
भोर : मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी चाललेला लढा संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. काही दिवसांपासून त्यांच्या विराट सभा संपूर्ण महाराष्ट्रात पार पडत आहेत. मराठा बांधवांकडून त्यांच्या या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मध्ये पुणे सुद्धा मागे राहिले नाही. पुण्यात ही विविध ठिकाणी त्यांच्या सभा पार पडत आहेत. या सभेनंतर आता जरांगे पाटलांची सभा भोर मध्ये धडाडणार आहे.
पुण्यातील भोरमध्ये जरांगे पाटलांची सभा पार पडणार आहे. येत्या १९ नोव्हेंबर रोजी भोरमध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे.त्यामुळे भोर मधील जनता जरांगे पाटलांना कसा प्रतिसाद देईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जरांगे पाटलांची भोर तालुक्यात पहिल्यांदाच भव्य सभा पार पडणार आहे. या सभेसाठी सकल मराठा समाजातर्फे जोरदार तयारी चालू आहे. हि सभा शेटे मैदान, विद्यानगर,वाघजाई रोड, भोर येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे. तसेच सभेची तयारी आत्तापासूनच चालू करण्यात आली आहे. त्यामुळे ही सभा भोर मध्ये “न भूतो न भविष्यती” अशी ठरणार असल्याचे सकल मराठा समाजाचे भोर चे अध्यक्ष संजय भेलके यांनी सांगितले.