संग्राम थोपटेंच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला कर्ज मिळणार? महाराष्ट्र सरकारकडून २१ कारखान्यांना थकहमी कर्ज जाहीर

मुंबई : सहकारी कारखान्यांना एनसीडीसी मार्फत थकहमी कर्ज देणे प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात विविध कारखान्यांचा चेअरमन सोबत बैठक पार पडली आहे.

महाराष्ट्रातील काही कारखान्यांना वाचवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी महाराष्ट्र सरकार एक पाऊल पुढे टाकत आहे. सहकार विभागाकडून कोणत्या कारखान्यांना थकहमी कर्ज उपलब्ध करुन द्यायचे याची यादी तयार करण्यात आली आहे. एकूण २१ कारखान्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. यामध्ये भोर मधील आमदार संग्राम थोपटेंच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला देखील कर्ज मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बैठकीनंतर सहकारमंत्री वळसे पाटील अर्थमंत्री अजित पवार यांच्या भेटीला दाखल झाले. उद्या पार पडणाऱ्या कॅबिनेट बैठकीत कारखान्यांना थकहमी देण्याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement

या कारखान्यांना कर्ज मिळणार?
१)– सुंदरराव सोळूखे सहकारी साखर कारखाना, बीड .
२)– संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा.
३)– वृध्दश्र्वेशर सहकारी साखर कारखाना, पाथर्डी अहमदनगर.
४)- लोकनेते मारुतीराव घुळे सहकारी साखर कारखाना, नेवासा.
५)- किसन वीर सहकारी साखर कारखाना, वाई .
६)- क्रांतीविर नागनाथ अण्णा सहकारी साखर कारखाना, वाळवा सांगली .
७)- किसन वीर सहकारी साखर उद्योग, खंडाळा सातारा .
८)- अगस्ती सहकारी साखर कारखाना अगस्ती नगर, अकोले .
९)- कर्मवीर कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा .
१०)– स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना, अक्कलकोट
११)- मुळा सहकारी साखर कारखाना, सोनई नेवासा.
१२)– शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा .
१३)– शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, कोपरगाव
१४)- तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर.
१५)– रावसाहेब पवार घोडगांगा सहकारी साखर कारखाना, शिरूर .
१६)- राजगड सहकारी साखर कारखाना, भोर.
१७)- विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना, मुरूम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page