नसरापूर येथील शंकरराव भेलके महाविद्यालयात “स्कुल कनेक्ट” कार्यशाळेचे आयोजन
नसरापूर : आपल्या आवडीचे विषय निवडून सर्वाना आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेता येणार असून येणाऱ्या काळामध्ये सर्वानी तंत्रज्ञान शिकणे महत्वाचे आहे. कारण लागू झालेले नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे बहुआयामी आहे. असे प्रतिपादन प्राचार्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यापरिषद सदस्य, सिनेट सदस्य डॉ.नितीन घोरपडे यांनी शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर येथे आयोजित “स्कुल कनेक्ट”(एनइपी २०२०) या कार्यशाळेमध्ये केले. पुढे त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षणाचे वेगवेगळे टप्पे यामध्ये प्राथमिक शिक्षण ते महाविद्यालयीन शिक्षण कशा प्रकारे असणार आहेत याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांचे संपूर्ण पदवीचे असणारे क्रेडिट अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये साठविले जाऊन त्यामधून त्याची गुणवत्ता ठरविली आहे असे मत व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ(नियोजन व विकास विभाग) आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ विद्यापीठ गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक व पाहुण्यांचा परिचय कार्यशाळा समन्वयक प्रा.भगवान गावित केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.संजीव लाटे, अमृतेश्वर महाविद्यालय, विंझर यांनी नवीन शैक्षणिक धोरण एक संधी आहे त्याचे सोने कसे करावयाचे हे आपण ठरविले पाहिजे असे मत व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य, प्रा.डॉ.धोंडीराम पवार, यांनी नवीन शैक्षणिक धोरण नेमके काय आहे हे अधोरेखित करून पदवी किती वर्षात मिळविता येणार, किती क्रेडिट मिळविले म्हणजे आपली पदवी पूर्ण होईल, अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे काय?, मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्सिट काय असणार आहे ते सविस्तरपणे विद्यार्थी, पालक व उपस्थित प्राध्यापकांपुढे मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये नवीन शैक्षणिक धोरण सर्वांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी असून सर्वानी स्वीकार करून त्याचा लाभ घेणे गरजेचं आहे. आमचे शंकरराव भेलके महाविद्यालय नवीन शैक्षणिक धोरणासाठी सज्ज असून महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणासाठी डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओ, अद्ययावत ग्रंथालय आणि वाचान कक्ष, नाविन्यपूर्ण अद्यावत संगणक लॅब, भाषा लॅब, खेळाचे अद्ययावत साहित्य, अद्यावत जिमखाना, खेळासाठी प्रशस्त असे क्रीडांगण अशा सुविधा महाविद्यालयात उपलब्ध आहेत त्याचा उपभोग भोर, वेल्हा तालुक्यातील सर्व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थांनी घ्यावा असे मत व्यक्त केले.
या कार्यशाळेचे आयोजन ग्रंथपाल प्रा.भगवान गावित यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या मार्दर्शनाखाली केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जगदीश शेवते यांनी तर आभार प्रा.प्रल्हाद ननावरे यांनी मानले. कार्यशाळेस महाविद्यालयातील प्रा.संगीता घोडके, डॉ.हिमालया सकट, प्रा.सहदेव रोडे, प्रा.पौर्णिमा कारळे, प्रा.जीवन गायकवाड, डॉ.सचिन घाडगे, प्रा.दयानंद जाधवर,प्रा.संदीप लांडगे, प्रा.वर्षा तनपुरे, प्रा.माउली कोंडे, प्रा.महेश कोळपे, प्रा.कोमल पोमण, प्रा.ऐश्वर्या धुमाळ, विकास ताकवले, आशिष परमार, महेश दळवी, सुमित कांबळे, अभिषेक मोरे, धनाजी माने, मनीषा मोहिते इ. सर्वांचे सहकार्य लाभले तसेच सर्व कार्यशाळेस विद्यार्थ्यांसह पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.