अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीचा भांडाफोड; परराज्यातील १३ तरुण-तरुणींना अटक
पुणे : पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या लोणावळ्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोणावळ्यात पर्यटकांना थांबण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंगल्यांमध्ये अश्लील व्हिडीओ तयार केले जात असल्याचे उघड झाले आहे. हे अश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर लोणावळ्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
लोणवळ्यातील एका बंगल्यावर हा गोरख धंदा सुरू होता. पोलिसांनी अश्लील व्हिडीओ शूट करण्यासाठी लागणारा कॅमेरा आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून काही अश्लील व्हिडिओही जप्त केलेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तब्बल १३ जणांना अटक केलीय. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपींमध्ये सर्व तरुणांचा सहभाग आहे.
भारतातील वेगवेगळ्या राज्यातून हे सर्व तरुण लोणावळ्यात एकत्र आले होते. भारतात अश्लील व्हिडिओ बनवणे कायद्याने गुन्हा आहे. असे व्हिडिओ बनवण्याव बंदी आहे. असं असतानाही लोणावळ्यातील एका बंगल्यात हा प्रकार सुरु होता. या सर्व आरोपीविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धुमाळ करीत आहेत.