भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष पदी अतुल काकडे यांची निवड
भोर : भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष पदी अतुल काकडे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तसेच उपमख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते आज शनिवारी(दि. १३ एप्रिल) हे निवडीचे पत्र काकडे यांना देण्यात आले. या प्रसंगी भालचंद्र जगताप, रणजित शिवतरे, सचिन घोटकुले, केदार देशपांडे, कुणाल धुमाळ, अजिंक्य देशपांडे, ऋषिकेश कारळे, लोकेश घोणे, बाळासाहेब शेटे, प्रशांत पवार, ऋषिकेश गायकवाड आदी उपस्थित होते.
एक संघ पणे व प्रामाणिकपणे अजित पवारांच्या विचारांशी एकनिष्ठ राहणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून अतुल काकडे यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच निवड केल्यानंतर काकडे यांचे भोर शहरातील कार्यकर्त्यांद्वारे अभिनंदन केले जात आहे.
कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना अतुल काकडे बोलले की, अजित पवार यांनी भोर शहरात काम करण्याची मला जी संधी दिली आहे. त्या संधीचे मी सोने करेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करेल. तसेच आगामी काळातील लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना जास्तीत जास्त मताधिक्य भोर शहरातून मिळवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भोर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करून अजित पवार यांच्या मागे ठाम उभी करून भोर शहरातील जनसामान्यांचे प्रलंबित प्रश्न व अडचणी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवून त्यांची कामे मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.