खेड शिवापूर येथील हॉटेल व्यवसायिकावर बालकामगार ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल…
खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गालगत खेड शिवापूर मधील हॉटेल चंद्रप्रसाद येथील हॉटेल मालक विशाल ज्ञानेश्वर कोंडे रा. खेड शिवापूर बाग, हवेली, जि. पुणे याच्यावर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ नुसार कलम ७९ अंतर्गत आज सोमवार (दि.१६ ऑक्टोबर) रोजी राजगड पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,महाराष्ट्र शासन, उदयोग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्रमांक सीएल- २००९(४), दिनांक २ मार्च, २००९ च्या कायद्या नुसार बाल कामगार कृती दलाअंतर्गत दि.२२ऑगस्ट रोजी करण्यांत आलेल्या कार्यवाहीत शानि गुप्ता,(वय १३वर्षे) हा बाल कामगार काम करीत असताना आढळून आल्याने, हॉटेल मालकावर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत करुन पुढील योग्य ती कार्यवाही करावी, या विनंती चे पत्र महिला कक्ष,बाल कामगार यांच्या कडून दि.२६ सप्टेंबर २०२३ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, भरोसा सेल, पुणे ग्रामिण दि.२५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र षासन, कामगार उप आयुक्त कार्यालय,संगमवाडी, पुणे यांचेकडून आज रोजी सदर गुन्ह्याचे कागदपत्र राजगड पोलीस स्टेशन येथे प्राप्त झालेने सदर कागदपत्राचे अवलोकन करुन आज सोमवार (दि.१६) रोजी पोलीस अंमलदार खरात यांनी गुन्हा दाखल केला.सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन चे पोलीस अंमलदार राहुल कोल्हे करीत आहेत.