सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची नेमकी संपत्ती किती? प्रतिज्ञा पत्रातून आले समोर
बारामती : बारामती लोकसभा निवडणूक ही सध्या सर्वात चर्चेत असणारी निवडणूक आहे. कारण इथे पवार विरुद्ध पवार असाच सामना आहे. त्यातच गुरुवारी(दि. १८ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी प्रतिज्ञापत्रातून त्यांची नेमकी किती संपत्ती आहे हे आता समोर आलं आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांच्याकडे ३८ कोटी रुपये किंमतीची स्थूल मालमत्ता इतकी आहे. तर त्यांचे पती सदानंद सुळे यांची तब्बल १ अब्ज १४ कोटी एवढी प्रचंड संपत्ती आहे.
पाहा सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची नेमकी किती संपत्ती:
२०२२-२०२३ मध्ये नेमके किती उत्पन्न –
– सुप्रिया सुळे यांचे २०२२-२०२३ मध्ये १ कोटी ७८ लाख ९७ हजार ४६० रुपये उत्पन्न होते.
– सदानंद सुळे यांचे २०२२-२०२३ मध्ये ३ कोटी ९० लाख २ हजार २२० उत्पन्न होते.
बँकेतील एकूण ठेवी –
– सुप्रिया सुळे यांच्या बँकांमध्ये तब्बल ११ कोटी ८३ लाख २९ हजार १९५ रुपयांच्या ठेवी आहेत.
– सदानंद सुळे यांच्या बँकांमध्ये तब्बल २ कोटी ५७ लाख ७४ हजार १५० आहेत.
किती कोटींचे शेअर्स?
सुप्रिया सुळे यांच्याकडे १६ कोटी ४४ लाख २४ हजार १४० रुपयांचे शेअर्स आहेत.
सदानंद सुळे यांच्याकडे ३३ कोटी ५७ लाख ५८ हजार ९६२ रुपयांचे शेअर्स आहेत.
राष्ट्रीय बचत योजनेत किती गुंतवणूक
सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय बचत योजनेत ७ लाख १३ हजार ५०० रुपये एवढी गुंतवणूक आहे.
सदानंद सुळे यांची राष्ट्रीय बचत योजनेत १६ लाख ३४ हजार ३० रुपये एवढी गुंतवणूक आहे.
कोणाला किती कर्ज दिले?
– सुप्रिया सुळे यांनी ३ कोटी ५० लाख ८६ हजार ८० रुपयांचे कर्ज दिले आहे.
– सदानंद सुळे यांनी ६० कोटी ८ लाख ७१ हजार २५३ रुपयांचे कर्ज दिले आहे.
रोख रक्कम किती?
– सुप्रिया सुळे यांच्याकडे ४२ हजार ५०० रोख रक्कम आहे.
– सदानंद सुळे यांच्याकडे ५६ हजार २०० रोख रक्कम आहे.
सोनं किती?
– सुप्रिया सुळे यांच्याकडे १ कोटी १ लाख १६ हजार १८ रुपये किंमतीचं सोनं आहे.
– सदानंद सुळे यांच्याकडे १ कोटी १३ लाख ८१ हजार ८५५ रुपये किंमतीचं सोनं आहे.
चांदी किती?
– सुप्रिया सुळे यांच्याकडे ४ लाख ५३ हजार ४४६ रुपयांची चांदी आहे
– सदानंद सुळे यांच्याकडे १७ लाख ६२ हजार ७२ रुपयांची चांदी आहे
हिऱ्याच्या वस्तू किती?
– सुप्रिया सुळे यांच्याकडे एक कोटी ५६ लाख ६ हजार ३२१ रुपये किंमतीच्या हिऱ्यांच्या वस्तू आहेत.
– सदानंद सुळे यांच्याकडे एक कोटी ६२ लाख ७४ हजार २५३ रुपये रुपये किंमतीच्या हिऱ्यांच्या वस्तू आहेत.
एकूण स्थूल मालमत्ता किती?
– सुप्रिया सुळे यांची एकूण स्थूल मालमत्ता ही तब्बल ३८ कोटी ६ लाख ४८ हजार ४३१ रुपये एवढी आहे.
– सदानंद सुळे यांची एकूण स्थूल मालमत्ता ही तब्बल १ अब्ज १४ कोटी ६३ लाख ८० हजार ५७५ रुपये एवढी आहे.
शेतजमीन किती?
– सुप्रिया सुळे यांच्याकडे ९ कोटी १५ लाख ३१ हजार २४८ रुपयांची शेतजमीन आहे.
– सदानंद सुळे यांच्याकडे ४ कोटी ६६ लाख २६ हजार ९४ रुपयांची शेतजमीन आहे.
सुप्रिया सुळे यांनी कोणाकडून किती कर्ज घेतलं आहे?
– सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांच्याकडून २० लाख रुपये आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाख रुपये एवढं कर्ज घेतलं असल्याचं आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.