तहानलेल्यांची तहान भागवण्यासाठी “चंद्रकांत बाठे” कायम कटीबद्ध
किकवी : वागजवाडी(ता. भोर) गावातील कातकरी वस्ती येथील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली ४ ते ५ दिवस अतिशय गंभीर झाला होता. तो सोडविण्यासाठी विघ्नहर्ता प्रतिष्ठान व पतसंस्था तसेच श्री चंद्रकांतदादा बाठे युवा मंच यांनी स्वखर्चाने पाण्याचा टँकर सुरू केल्याने येथील लोकवस्तीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
वागजवाडी गावासाठी जलजीवन योजनेच्या अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. ती पूर्ण व्हायला अजून बराचसा अवकाश आहे. या दरम्यान गावातील पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत आटल्यामुळे वस्तीवरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या झळा तीव्र प्रमाणात जाणवू लागल्या होत्या. त्यानंतर येथील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांची भेट घेऊन या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती केली. चंद्रकांत बाठे यांनी तातडीने वागजवाडी गावचे ग्रामसेवक घायतडक यांच्याशी फोन वरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीमध्ये वस्तीवरील लोकांना टँकरने पाणीपुरवठा करता येईल एवढा निधी उपलब्ध नाही”.
यानंतर या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चंद्रकांत बाठे यांनी ऐन उन्हाळ्यात सामाजिक जाणिवेतून वस्तीवर पाण्याचा टँकर सुरू करून येथील नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. टँकर सुरू झाल्याने या वस्तीवरील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जोपर्यंत जलजीवन योजनेच्या अंतर्गत वस्तीवर पाणी येणार नाही तोपर्यंत येथील लोकांसाठी पाण्याचे टँकर सुरू ठेवणार असून “तहानलेल्यांची तहान भागवण्यासाठी कायम कटीबद्ध”, असल्याचे चंद्रकांत बाठे यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या ह्या निःस्वार्थ उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, गणेश आवाळे, सूरज शिनगारे, किरण तारू, नारायण भिलारे, संतोष राऊत, विठ्ठल मोरे, संदीप दीक्षित किरण येवले, मोहन थोपटे, योगेश मोरे, बन्सी मोरे, दशरथ मुकणे, नितीन मुकणे, बंडु पवार आदी उपस्थित होते.