तुतारी चिन्हावर आक्षेप नोंदवण्याची वेळ निघून गेली; निवडणूक आयोगाचे सुप्रिया सुळेंना उत्तर

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे अधिकृत चिन्ह दिले. मात्र, इतर पक्षाच्या काही उमेदवारांना दिलेले ट्रम्पेट चिन्ह आणि ‘तुतारी’त साधर्म्य असल्याने बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी घेतलेला आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला. आक्षेप घेण्याची वेळ निघून गेल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

ट्रम्पेट या वाद्याचे ‘तुतारी’ असे भाषांतर आयोगाच्या पुस्तकात असल्याने मतदारांत गोंधळ निर्माण झाल्याचे सुळे यांनी आक्षेपात म्हटले होते. ट्रम्पेट हे मुक्त-चिन्ह असून त्याचे वाटप अगोदरच झाले आहे, त्यामुळे आता यावर आक्षेप नोंदवण्याची वेळ निघून गेली आहे. तसेच मतदान करताना ट्रम्पेट आणि तुतारी ही चिन्हे दिसतात, त्यांची नावे नाहीत. त्यामुळे मतदारांचा गोंधळ होण्याचा प्रश्न नाही, दोन्ही चिन्हांची तुलना होऊ शकत नाही,” असेही चोकलिंगम यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page