पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; द्रुतगती महामार्गावर उद्या पुन्हा एकदा ६ तासांचा मेगाब्लॉक
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाने वरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या मार्गावर कॉरिडॉरचे काम केले जाणार आहे त्यामुळे हा मेघा ब्लॉक घेतला जाणार आहे.
कामाच्या वेळेत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाने मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद असणार आहे. हलक्या व अवजड वाहनांना या वेळेत महामार्गावर प्रवेश दिला जाणार नाही.
यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम किमी ७.५६० (चिखले ब्रिज) येथे गुरुवार (दि. १८ जानेवारी) रोजी ११ ते ५ च्या दरम्यान करण्यात येणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे करण्यात येणाऱ्या वरील नियोजित कामाचे वेळी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर सर्व प्रकारची वाहने (हलकी व जड अवजड वाहने) यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग
१. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने मुंबई लेन कि.मी. ५५ वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र ४८ या मार्गावरून मार्गस्त करता येतील.
२. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने व बसेस मुंबई लेन कि.मी. ३९.८०० खोपोली एक्झिट वरून वळवून पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून मार्गस्त करता येतील.
३. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने ही खालापूर टोल नाका शेवटच्या लेन ने खालापूर एक्झिट कि.मी. ३२.५०० येथून वळवून पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्त करता येतील.
४. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने मुंबई लेन कि.मी. ९.६००पनवेल एक्झिट वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून करंजाडे मार्गे कळंबोली अशी मार्गस्थ करता येतील.
५. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने शेडुंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.