उद्या नसरापूर येथे धडाडणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोफ; बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते करणार शिवसेनेत प्रवेश

खेड शिवापूर : बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवारी(दि. १ मे) शिवाजी विद्यालय चेलाडी, नसरापूर (ता. भोर) येथे सायंकाळी ५ वाजता घेण्यात येणाऱ्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती वेळू(ता. भोर) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महायुतीचे प्रचारप्रमुख कुलदीप कोंडे यांनी दिली.

यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, या सभेच्या निमित्ताने भोर-राजगड-मुळशी येथील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. तसेच भोर-राजगड तालुक्यातील थांबलेल्या विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून आम्ही सर्व जण एकत्र आलो असल्याचेही त्यांनी यावेळेस सांगितले.

Advertisement

या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भोरच्या एमआयडीसीचा मुद्दा समोर येणार असून या सभेनिमित्त मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे दिसून येत आहे. या पत्रकार परिषदेच्या वेळी कुलदीप कोंडे, रमेश कोंडे, रणजीत शिवतरे, भालचंद्र जगताप, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, जिवन कोंडे, अमोल पांगारे, बाळासाहेब गरुड, संतोष घोरपडे, विकास चव्हाण, स्वप्नील गाडे तसेच बहुसंख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page