तुम्ही मला साथ द्या, मी राजगड तालुका दत्तक घेणार – अजित पवार

राजगड : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारा निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेल्हे या ठिकाणी येऊन सभा घेतली. या सभेच्या वेळी, वेल्हेकरांनो तुम्ही मला साथ द्या, मी राजगड तालुका दत्तक घेणार असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची होत असून सर्व देशाचे लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेले आहे. त्यानिमित्त आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी दोन्ही पक्षाकडून सभांचा तडाका सुरू होता.  यादरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेल्हे येथील मेंगाई मंदिर मैदानात सभा घेतली. तालुक्यातील महत्त्वाचा मढेघाट रस्त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, या संदर्भात सर्वे पूर्ण झाला असून या रस्त्याचा काही भाग वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने येथे अडथळा निर्माण झालेला आहे. लवकरच हा अडथळा देखील दूर करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच गुंजवणी धरणाचे पाणी सर्वप्रथम विले आणि भोरकरांना मिळालेच पाहिजे ही देखील आमची आग्रही भूमिका आहे. सासवडच्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वतः याबाबत सकारात्मक असून लवकरच हा प्रश्न देखील मार्गी लागेल, तसेच तालुक्यातील पर्यटनासाठी राजगड व तोरणा या किल्ल्याच्या विकासासाठी सर्व्हे करणार असून भरघोस असा निधी देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. गेली पंधरा वर्षे या ठिकाणी आमदार व खासदार काम करीत आहेत.

Advertisement

येथील आमदार आणि खासदार करतात तरी काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. लोकांच्या मूलभूत गरजा देखील या लोकांना पूर्ण करता आल्या नाहीत. तर त्यांना झोप तरी कशी काय लागते. खासदार सुप्रिया सुळे व विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी टीका केली. आचारसंहिता संपल्यानंतर येथे सर्व अधिकाऱ्यांची बैठक लावून येथील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना साथ द्या, म्हणजेच मला साथ द्या मी राजगड तालुका दत्तक घेणार आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page