संपूर्ण पुणे जिल्ह्यात “या” दिवसांसाठी “ड्राय डे” घोषित
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय(पुणे) यांच्या आदेशानुसार संपूर्ण पुणे जिल्ह्यात खालील दिवसांसाठी ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा (शिरूर, पुणे, मावळ आणि बारामती) मतदारसंघात ७ मे आणि १३ मे रोजी निवडणूक आयोगातर्फे मतदान घेण्यात येणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार असून शिरूर,मावळ आणि पुणे या मतदारसंघात १३ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खालील दिवसांकरिता ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आले आहेत.
१) दिनांक ५ मे २०२४ (रविवार) : सायंकाळी ६ पासून पुढे
२) दिनांक ६ मे २०२४ (सोमवार) : संपूर्ण दिवस
३) दिनांक ७ मे २०२४ (मंगळवार) : सायंकाळी ६ वाजे पर्यंत किंवा प्रत्यक्ष मतदान संपेपर्यंत
४) दिनांक ११ मे २०२४ (शनिवार) : सायंकाळी ६ पासून पुढे
५) दिनांक ११ मे २०२४ (रविवार) : संपूर्ण दिवस
६) दिनांक १३ मे २०२४ (सोमवार) : सायंकाळी ६ पर्यंत किंवा प्रत्यक्ष मतदान संपेपर्यंत.
७) दिनांक ४ जून २०२४ (मंगळवार) : (मतमोजणीचा) संपूर्ण दिवस
वर घोषित करण्यात आलेल्या ड्राय डे दिवशी कोणीही अनुचित प्रकार करू नये असे आवाहन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले असून जर कोणी तसे करताना आढळले तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे.