ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रकिया तब्बल दीड तास खोळंबली; भोर तालुक्यातील भांबवडे येथील घटना
भोर : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानास आज मंगळवारी(दि. ७ मे) सकाळी ७ वाजता सुरूवात झाली. भोर तालुक्यातील मौजे भांबवडे येथील बुथ क्रमांक ४५५ वर सकाळी ७ वाजून १० मिनिटाला सुरूवातीचे ५ मतदान झाल्या नंतर ई.व्ही.एम मशिन बंद पडल्याने मतदाराचा हिरमोड झाला तर बरेच मतदार हे आपापल्या कामाला निघून गेल्याचे दिसून आले.
बारामती लोकसभा येथील मतदान आज ७ मे रोजी होत आहे. सकाळी ७ ते सायं ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ निवडणूक आयोगाने दिलेली आहे. आज लोकशाही उत्सव व विवाहाचे तिथी मोठ्या असल्याने अनेक गावात लग्न समारंभ चे कार्यक्रम व उन्हाचा चढता परा लक्षात घेता अशा धावपळीत मतदानाचा हक्क बजावने अधीकर्तव्य असल्याने नागरिकांनी सकाळीच मतदान केंद्रावर मतदानचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली. परंतु भोर तालुक्यातील मौजे भांबवडे येथे सकाळ चे ७ वाजून १० मिनिटांनी पहिले पाच मतदान झाले. त्यानंतर ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया खोळंबल्याने ई.व्ही.एम मशीनचा संच बदलण्यात आला असून मतदान ८ वाजून ५० मी पुन्हा सुरळीत सुरूवात झाले. मशिन संच बदलण्यास व मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यास तब्बल १ तास ४० मी चा वेळ लागला. यामुळे मात्र भांबवडे गावातील मतदार वर्ग नाराज झाला असल्याचे पहायला मिळाले.