लोकसभा मतमोजणीची तयारी सुरू; बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे होणार
पुणे : जिल्ह्यातील बारामती पुणे, शिरुर, आणि मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि. ४ जून रोजी होणार आहे. मतमोजणीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या २० फेरी, बारामती २३, शिरूर २६ आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे २५ फेरी होणार आहे.
पुणे लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात २ हजार ५१६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मतदारसंघातून सर्वाधिक ५६१ मतदान केंद्र भोर विधानसभा मतदारसंघात आणि खडकवासला मतदारसंघात ५१५ मतदान केंद्र असल्याने दोन्ही ठिकाणी २३ फेऱ्या होणार आहेत. तर, पुरंदर, बारामती आणि इंदापूर मतदारसंघासाठी २१, तर दौंड विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या २२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.