भोर तालुक्याचा दहावीचा निकाल ९६.८८ टक्के; तालुक्यातील सर्व माध्यमिक महाविद्यालयांचा निकाल सविस्तर वाचा

भोर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी(दि. २७ मे) जाहीर करण्यात आला. यामध्ये भोर तालुक्याचा निकाल ९६.८८ टक्के लागला आहे.

भोर तालुक्यातील ५० माध्यमिक महाविद्यालयांमधील दहावीच्या परीक्षेला बसलेल्या २ हजार १२२ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ०५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ६७६ विद्यार्थ्यांनी डिस्टींक्शन श्रेणी मिळवली आहे. सर्वाधिक ८३७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.  ४३८ विद्यार्थ्यांनी व्दीतीय श्रेणी मिळवली आहे. तर १०५  विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

Advertisement

भोर तालुक्यातील माध्यमिक महाविद्यालयांच्या निकालाची टक्केवारी खालीलप्रमाणे
– राजा रघुनाथराव विद्यालय, भोर – ९४.८४
– आदर्श विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज, नेरे – १००
– श्री शिवाजी विद्यालय नसरापुर – ९८.९१
– श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी – ९८.८२
– श्री छत्रपती शिवाजी विद्यालय भोर – ९४.०५
– न्यू इंग्लिश स्कूल न्हावी – १००
– श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे – ९३.९३
– श्री वीर बाजीप्रभू विद्यालय शिंद – १००
– भारती विद्यापीठ एम.जे. फुले प्रशाला, शिंदेवाडी – ९८.०३
– क्रांतिवीर फडके माध्यमिक विद्यालय, चिखलगाव – ९७.९५
– न्यू इंग्लिश स्कूल, संगमनेर – ९४.८७
– दिनकरराव धाडवे पाटील माध्यमिक विद्यालय सारोळे – ९५.१२
– पिसावरे माध्यमिक विद्यालय, पिसावरे – ९४.७३
– गर्ल्स हायस्कूल भोर – ९३.४७
– माध्यमिक विद्यालय आपटी – ९१.९३
– माध्यमिक विद्यालय पसुरे – १००
– श्री काशिनाथराव खुटवड माध्यमिक विद्यालय हातवे(बु) – ९६.४७
– न्यू इंग्लिश स्कूल वरवे – ९८.०३
– न्यू इंग्लिश स्कूल उत्रौली – ९४.११
– सरनोबत एस. एस. थोपटे विद्यालय, खानापूर – ९८
– आप्पासाहेब बांदल विद्यालय आळंदे – ९२.१०
– माध्यमिक विद्यालय महुडे (बु) – १००
– राजगड ज्ञानपीठ माध्यमिक विद्यालय जोगवडी – १००
– येसाजी कंक विद्यालय करंदी(वाढाणे) – ९३.३३
– कान्होजी जेधे विद्यालय कारी – १००
– रायरेश्वर विद्यालय टिटेघर – ९३.१८
– मुरारबाजी देशपांडे विद्यालय वाठार हिंगे – १००
– रोहिडेश्वर माध्यमिक विद्यालय नाटंबी – १००
– बाजी पासलकर विद्यालय बाजारवाडी – ९१.६६
– संत लिंगनाथ स्वामी माध्यमिक विद्यालय निगडे – १००
– काळेश्वरी माध्यमिक विद्यालय अंबाडे – १००
– जिजामाता विद्यालय भोर – १००
– रायरी माध्यमिक विद्यालय – ९६
– समर्थ रामदास स्वामी विद्यालय हिरडोशी – ९६.८७
– माध्यमिक विद्यालय कुरुंगवडी – ९५.६५
– गव्हर्मेंट सेकंडरी आश्रम शाळा पांगारी – ९२.३०
– न्यू इंग्लिश स्कूल कामथडी – ९७.१४
– आठवले माध्यमिक विद्यालय माळेगाव – १००
– श्री समर्थ माध्यमिक विद्यालय काळेवाडी – १००
– न्यू इंग्लिश स्कूल कुसगाव – ९६
– सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय पाले – १००
– अमृतराव बांदल विद्यालय सांगवी येवली – १००
– माध्यमिक विद्यालय बारे (बु) – १००
– माध्यमिक विद्यालय कांबरे(खे.बा) – ८३.३३
– समर्थ विद्यामंदिर – १००
– आश्रम शाळा कुरुंजी – ८८
– जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल भोर – १००
– अम्रिता विद्यालय नसरापुर – १००
– इंग्लिश मीडियम स्कूल भोलावडे – १००
– नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल नायगाव – १००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page