जमिनीच्या वादातून खून करून पसार झालेल्या आरोपीस भोर तालुक्यातील रावडी येथून भारती विद्यापीठ पोलिसांनी केले अटक

भोर : कात्रज कडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रोडवर दत्तनगर बस स्थानकाजवळ(आंबेगाव बुद्रुक, पुणे) दि. ५ मे २०२४ रोजी जमिनीच्या वादातून विलास जयवंत बांदल(वय ५५ वर्ष सध्या रा.त्रिमुर्ती रेसीडेन्सी, कात्रज, मुळ गाव पिसावरे, ता. भोर) यांचा खुन करुन पसार झालेला आरोपी संतोष ऊर्फ पप्पु पाबेकर (वय ४५ वर्षे, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) यांस भारती विद्यापीठ पोलिसांनी रावडी (ता. भोर, जि. पुणे) येथून मोठ्या शिताफीने पकडले आहे. या घटनेबाबत मयत विलास बांदल यांचा मुलगा अभिषेक विलास बांदल(वय २४ वर्ष) याने फिर्याद दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिलेल्या फिर्यादीवरून दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपींचा पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे, अभिनय चौधरी, सचिन गाडे यांनी घटनास्थळ ते दत्तनगर, तसेच कात्रज हायवेवरील सर्व सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक करुन तसेच गोपनीय बातमीदारामार्फतीने माहिती घेऊन सदर घटनेतील मयत विलास जयवंत बांदल यांस त्याचा मित्र संतोष ऊर्फ पप्पु पाबेकर (वय ४५ वर्षे, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) याने जमीनीच्या वादातुन जिवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले.

Advertisement

सदर आरोपी कोणताही मोबाईल फोन वापरत नसल्यामुळे आरोपीस पकडण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आरोपीस पकडण्यासाठी वरीष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी चार वेगवेगळ्या टीम तयार करुन शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे नमुद आरोपीचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना आरोपी हा रावडी(ता. भोर, जि. पुणे) या गावात त्याचे नातेवाईकांना भेटण्यासाठी आला आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती. तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर कदम, सचिन गाडे यांनी रावडी(ता. भोर, जि. पुणे) येथे जावून संतोष ऊर्फ पप्पु पाबेकर यास ताब्यात घेवुन गुन्हयात अटक केली आहे.

सदरची कामगिरी ही भारती विदयापीठ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर कदम, पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, अवधतु जमदाडे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, हर्षल शिंदे, विक्रम सावंत, राहुल तांबे यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page