शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सारोळे येथे आयोजित केलेले रक्तदान शिबिर संपन्न
सारोळे : अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने सारोळे(ता.भोर) येथे आज रविवारी(दि. ९ जून) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजता अक्षय ब्लड सेंटरचे पदधीकारी सुदर्शन घंटेवाड, रोहित बाचल, राज कुमार, शुभम गवळी आणि डॅा. देवानंद भिसे यांच्या हस्ते शिवरायांच्या चरणी पुष्पहार अर्पण करुन या कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
लोकांमधे रक्तदानाबाबत जनजाग्रुती व्हावी या हेतूने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता सुरू झालेले हे रक्तदान शिबिर ४ वाजेपर्यंत घेण्यात आले. या दरम्यान रक्तदान शिबिरासाठी उपस्थित राहून रक्तदान करणाऱ्या सर्वांना अक्षय ब्लड सेंटरतर्फे शालेय सॅग आणि पाण्याचे थरमॅसचे वाटप करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करत शिवराज्यभिषेक दिन अभिनव पद्धतीने साजरा केला.
या शिबिरासाठी विशेषतः झुंझार धाडवे, साईनाथ धाडवे, सौरभ धाडवे, भास्कर धाडवे, मिथुन दळवी, तुषार धाडवे, शुभम शेरे, ओमकार घारे, सूरज धाडवे, सुरज कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच या शिबिरावेळी रुपेश धाडवे, काळूराम महांगरे, महेश धाडवे, जालिंदर शिंदे, संतोष धाडवे, किरण धाडवे, किरण पवार, रोहन धाडवे, अजय धाडवे, अमोल भरगुडे, स्वप्नील धाडवे तसेच बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आयोजित केलेले रक्तदान शिबीर व त्या माध्यमातून होत असलेली जनहितार्थ मदत याचे उपस्थितांनी यावेळी कौतुक केले.