वेळू ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेश पांगारे व उपसरपंचपदी सौ. पुष्पा काळे यांची बिनविरोध निवड
खेड-शिवापूर : भोर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचे समजले जाणाऱ्या वेळू गावच्या सरपंचपदी सुरेश सोपान पांगारे व उपसरपंचपदी सौ.पुष्पा लक्ष्मण काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार केला.
वेळू ग्रामपंचायतचे मावळते सरपंच ईश्वर उर्फ हिरामण पांगारे व उपसरपंच सौ.सुजाता खुंटे यांनी ठरलेल्या मुदतीत सरपंच व उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. आज गुरुवारी(दि. २५ जुलै) रोजी पार पडलेल्या निवड प्रसंगी सरपंच रिक्त पदासाठी सुरेश सोपान पांगारे व उपसरपंच पदासाठी पुष्पा लक्ष्मण काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी कोरे मॅडम यांनी काम पाहिले. तसेच या प्रसंगी तलाठी रवींद्र काळे, ग्रामसेवक हरपुडे, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब धनवडे, मावळते सरपंच हिरामण पांगारे, अमोल बबन पांगारे, शिवाजी वाडकर, छाया ज्ञानेश्वर पांगारे, संगीता पांगारे, सुरेखा घुले, सारिका जाधव उपस्थित होते.
नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा भोर तालुका काँग्रेस पक्षाचे नेते ज्ञानेश्वर माऊली तात्या पांगारे, उद्योजक जीवन धनावडे, मंगेश सुर्वे, ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली पांगारे, दत्तात्रय पांगारे यांनी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.