राजा रघुनाथ विद्यालय भोर येथे आरोग्य आणि दंत चिकित्सा शिबिर संपन्न
भोर : भोर येथिल भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि निवासी मूक-बधिर विद्यालय भोर येथिल विद्यार्थ्यांसाठी बेईंग विथ यू हेल्प फाउंडेशन ने बेरीकॅप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड च्या सहकार्याने आरोग्य आणि दंत चिकित्सा शिबीराचे दि. १२ आणि १३ ऑक्टोबरला आयोजन केले होते. यानिमित्ताने मूक बधिर विद्यालयातील १ली ते १० वी आणि राजा रघुनाथराव विद्यालयातिल ५ वी ते ११ वी पर्यंतच्या पावणे दोन हजार विद्यार्थ्यांची आरोग्य आणि दंत चिकित्सा करण्यात आली.
बेईंग विथ यू हेल्प फाउंडेशन ही संस्था २०१९ पासून रुग्णांचे नातेवाईक आणि जेष्ठ नागरिक तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रात कार्यरत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्या साठी महानगर पालिकेच्या आणि गावां मधिल शाळांमधे आरोग्य व दंत चिकीत्सा शिबीरांचे आयोजन गेल्या वर्षी पासून ही संस्था करत आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे.गुरुवारी सकाळी ६.४५ मिनिटांनी सनसिटी येथून १८ व्हॉलेंटियर सह ८ डॉक्टरांची टिम भोरला ८.३० वाजता पोहोचली. नंतर राजा रघुनाथराव विद्यालयाच्या हॉल मधे मुख्याध्यापक भांगे सरांनी १० टेबल खुर्च्यांची व्यवस्था केली होती. दोन्ही दिवशी सकाळ आणि दुपारच्या सत्रात तपासणी करण्यात आली. काम करतांना पाळलेली सूसुत्रता, टिम वर्क आणि योग्य नियोजन या त्रीसुत्री मुळे आरोग्य शिबीर यशस्वी झाले.
१३ तारखेला जेवणा नंतर भोर एज्युकेशन सेसायटीच्या निवासी मूक-बधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य आणि दंत चिकित्सा करण्यात आली. त्यावेळी स्वतः शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर आणि शिक्षकांनी केलेल्या सहकार्या मुळे डॉक्टरांना मुलांशी संवाद साधणे सोपे गेले. दोन्ही शाळां मध्ये तपासणी नंतर प्रत्येक मुलाला बोर्नव्हिटा, टुथ पेस्ट, टुथ ब्रश, पेन, पेन्सिल असलेले पाऊच भेट दिले. मूक बधीर विद्यार्थ्यांना पाऊच दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून बेईंग विथ यू हेल्प फाउंडेशन च्या माधवी ठाकूरदेसाई यांनी जवळ जवळ महिना भर शिबीर यशस्वी व्हावे या साठी करत असलेल्या कष्टांचे चीज झाल्या सारखे वाटले.या शिबिरासाठी नवले हॉस्पिटल मधून ४ जनरल आणि सिंहगड इंन्स्टिट्युट मधून ४ दंत चिकित्सक डॉक्टरांची टिम उपलब्ध करून दिली गेली होती. त्यासाठी नवले हॉस्पिटलच्या डॉ. मधुकर जगताप सरांनी मदत केली.तसेच बेरीकॅप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आणि सहकाऱ्यांनी केलेल्या मदती मुळेच हे शिव धनुष्य पेलणे शक्य झाले असल्याचे मत माधवी ठाकूरदेसाई यांनी मांडले.