अपघात झाल्यावर पळून जाण्याचा विचार करत असताल तर सावधान; रस्त्यावर अपघात झाल्यावर पळून गेल्यास १० वर्षांची शिक्षा

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : रस्त्यावर अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. या गंभीर मुद्द्याबाबत सरकारने मोठे पाऊल उचलले असून, नवीन कायद्यानुसार रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या व्यक्तीने पळून जाऊन जखमी व्यक्तीला रस्त्यावर सोडल्यास त्याला १० वर्षांची शिक्षा होणार आहे. मात्र, अपघात घडवून आणणाऱ्या व्यक्तीने जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेल्यास त्याची शिक्षा कमी होईल. गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत या कायद्याची माहिती दिली आहे.

Advertisement

गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मोदीजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच आपल्या संविधानाच्या भावनेनुसार कायदे बनवले जाणार आहेत. दीडशे वर्षांनंतर हे तीन कायदे बदलल्याचा मला अभिमान आहे. काही लोक म्हणायचे की, आपण त्यांना समजून घेतले पाहिजे, मी त्यांना सांगतो की तुम्ही भारतीय असल्याचा मान ठेवले तर तुम्हाला समजेल. पण जर तुमचे मन इटलीचे असेल तर तुम्हाला कधीच समजणार नाही. भारतीय नागरी संरक्षण संहितेत (CRPC) पूर्वी ४८४ कलमे होती, आता ५३१ होतील, १७७ कलमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ९ नवीन विभाग जोडले गेले आहेत, ३९ नवीन उपविभाग जोडले गेले आहेत, ४४ नवीन तरतुदी आणि स्पष्टीकरणे जोडली गेली आहेत, ३५ विभागांमध्ये कालमर्यादा जोडण्यात आली आहे आणि १४ विभाग हटवण्यात आले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page