स्वयंदीप सोशल फाउंडेशनच्या वतीने भोर तालुक्यातील ११० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप
किकवी : स्वयंदीप सोशल फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने भोर तालुक्यातील किकवी, केंजळ, धांगवडी, कांबरे खे.बा, महुडे खु., महुडे बु., या गावातील इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या ११० विद्यार्थ्यांना आज शनिवारी(दि. १७ ऑगस्ट) किकवी येथे मोफत शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विशेषतः स्वयंदिप सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा मानसी वानखेडे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सुनंदा गायकवाड, पशुसंवर्धन विभाग भोरचे जयवंत गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रम प्रसंगी किकवी गावचे सरपंच नवनाथ कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी आर.पी.आय. एकतावादी कार्याध्यक्ष सुनील मोरे, सचिन कदम,नयन कदम, रुपाली कदम, सुजाता कदम, दत्तात्रय गोलाने, ग्रामपंचायत उपसरपंच, नितीन मोरे, धम्मांकुर प्रतिष्ठान उप उपाध्यक्ष सुनील जाधव, धांगवडी शाळा समिती अध्यक्ष सिद्धार्थ गोलाणे, जयेश आगवणे, सिध्दार्थ गोलाणे, महेंद्र कांबळे, सतीश कांबळे, दादासाहेब शेलार, महुडे खुर्द विकास सोसायटीचे चेअरमन नथुराम गायकवाड व पो.पाटील, अमित गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.