भोर विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक उद्धव ठाकरें सोबतच – तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे

नसरापूर : भोर तालुक्यातील वेळु-भोंगवली व नसरापूर-भोलावडे जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांची सभासद नोंदणी आढावा बैठक वरवे(ता.भोर) येथे आज रविवारी(दि. १५ सप्टेंबर) पार पडली. यावेळी शिवसैनिकांची नव्याने सभासद नोंदणी करण्यात येऊन गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक अभियान प्रभावीपणे राबवण्याचा ठराव करण्यात आला.

यावेळी बोलताना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भोर विधानसभा मतदार संघात पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसैनिकांने काम करत मोठे मताधिक्य दिले असून येत्या विधानसभा निवडणुकीत सुध्दा भोर मतदार संघातील शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या मागे ठाम राहतील. तसेच भोर विधानसभेची जागा शिवसेनेला सोडल्यास निश्चित भगवा फडकवु. आणि जागा अन्य पक्षाला सोडल्यास मातोश्रीच्या आदेशाने महाविकास आघाडीचा धर्माचे पालन करु. तसेच महाविकास आघाडीचे काम शेतकरी जसे शेती करताना एकमेकांना शेतात जाऊन मदत करतात तसे शेतकरयांच्या वारंगुळ्या सारखे आहे. आघाडीतील सहभागी पक्ष एकमेकांना अशीच मदत करत आहेत. आघाडीमधील एकसंघता कायम आहे, तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकात तिनही पक्षाने महाविकास आघाडीचा धर्म पाळणे आवश्यक आहे तो पाळला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisement

याप्रसंगी युवासेना तालुका प्रमुख अनिकेत शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, कुठलाही एक माणूस भोर तालुक्यात चालू शकत नसून एक लाख मतदान जरी त्याला पडले तरी ते एकट्याचे नसल्याचे शिवसैनिकांनी लोकसभेत दाखवून दिले आहे. त्यामुळे शिवसेना संघटनेचे काम आपल्याला सर्व शिवसैनिकांच्या ताकतीने वाढवायचे असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले.

याप्रसंगी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, तालुका संघटक दशरथ गोळे, तालुका संघटिका निशा सपकाळ, तालुका समन्वयक भरत साळुंखे, तालुका युवासेना प्रमुख अनिकेत शिंदे, तालुका उपसंघटिका राणी मांढऱे, रुपाली पडवळ, विभाग प्रमुख विजय सावंत, एकनाथ तावरे, माजी तालुका प्रमुख पोपट जगताप, बाळासाहेब सुतार, निलेश भांडे, जनार्दन हारपुडे तसेच आदी पदाधिकारी व जुने शिवसैनिक मोठ्या संख्येन उपस्थित होते. तालुका संघटक दशरथ गोळे यांनी सुत्रसंचालन केले तर माजी तालुका प्रमुख पोपट जगताप यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page