“मनी लॉन्ड्रींग” प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानांवर ईडीचे छापे
पुणे : जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या महंमदवाडी (पुणे )शिक्रापूर बुरुंजवाडी येथील निवासस्थानांवर ‘ईडी’ने छापेमारी केली आहे. आज मंगळवारी(दि. 20 ऑगस्ट) सकाळी सात वाजता ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी या निवासनांवर छापे मारले. यापूर्वी मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाने छापा टाकला होता. यावेळी प्रथमच ‘ईडी’ने कारवाई केली आहे.
कारवाईच्यावेळी मंगलदास बांदल हे आपल्या मोहम्मद वाडी पुणे येथील निवासस्थानी होते. तर शिक्रापूर येथील निवासस्थानी त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल तसेच बांदल यांचे भाऊ आहेत. ‘मनी लॉन्ड्रींग’ प्रकरणी ‘ईडी’ने ही कारवाई केली असून कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. बांदल यांच्याशी संबंधित बँकेची लाँकरही अधिकाऱ्यांनी तपासून पाहिले आहे.
बांदल हे शिवाजीराव भोसले सहकारी बँक प्रकरणातील आरोपी आहेत. बराच काळ ते तुरुंगात होते, सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांनी लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी घेतली होती, परंतु ती उमेदवारी नंतर वंचितनेच रद्द केली होती. शिरूर-हवेली विधानसभा लढविण्यासाठी सध्या ते इच्छुक आहे. बांदल हे ‘ईडी’च्या चौकशीसाठी चार वेळा उपस्थित राहिले असून ते तपास कामी वेळोवेळी उपस्थित राहिले असल्याची माहिती त्यांचे वकील अँड. आदित्य सासवडे यांनी दिली आहे.