भोर, वेल्हा(राजगड), मुळशीत भात लागवडी उरकल्या; १९ हजार ६२९ हेक्टर क्षेत्र लागवडी खाली

भोर : यंदा जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे भात लागवडीला चांगलाच वेग आला असल्याने आता भोर, वेल्हा(राजगड), मुळशी तालुक्यात जवळपास सर्वच ठिकाणी भात लागवडी उरकल्या असून सरासरीच्या २० हजार ०७० हेक्टरपैकी १९ हजार ६२९ हेक्टर भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत. सध्या भात पट्ट्यात होत असलेल्या तुरळक पावसामुळे भात पिकाची वाढ जोमदार असून पीक परिस्थिती चांगली आहे.

Advertisement

सात जूनच्या दरम्यान मॉन्सून दाखल झाल्यानंतर भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्याभोर, वेल्हा(राजगड), मुळशी या तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. विशेषतः धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने भात खाचरे तुडुंब भरली होती. त्यातच नद्याही दुथडी भरून वाहू लागल्याने धरणातील पाणीपातळीतही वाढ झाली. झालेल्या पावसामुळे भात लागवडीतील अडथळा कमी झाल्याने शेतकऱ्यांनी वेगाने भात लागवडी केल्या. तसेच मॉन्सून वेळेवर दाखल झाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला असल्यामुळे भात उत्पादकांची चिंता कमी झाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

भाताच्या विविध बियाण्यांच्या लागवडी :
दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी आंबेमोहोर, साळ, दोडकी, कोलम, इंद्रायणी, बासमती, सोनम या पारंपरिक भात बियाण्यांच्या लागवडी करत आहेत. तसेच पारंपारिक चारसुत्री, अभिनव पट्टा पद्धत, एसआरटी व इतर पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांनी भात लागवड केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page