“रचना संस्थे”च्या वतीने भोर तालुक्यात पर्यावरण संवर्धन जन जागृती मोहीम सुरु

भोर : रचना संस्थे द्वारा भोर तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या मुलांकरिता, ” आपली पृथ्वी आपणच वाचवूया, ” या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन विषयावर जन जागृती मोहीम भोरचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्या नेतृत्वाखाली व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

“रचना प्रेरणा प्रोग्राम” अंतर्गत तालुक्यातील ३८ शाळांच्या ३५०० शालेय मुलांसोबत स्वयं अध्ययनासाठी व सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहन पर कार्यक्रम राबविला जात आहे. त्यातूनच पर्यावरण व आरोग्य विषयी सत्र आयोजित केले जात आहे. या कार्यक्रमाद्वारा नव्या पिढीला पर्यावरण रक्षण करून जैव विविधता जपण्यासाठी प्रवृत्त केले जाते. मुलांच्या गटचर्चा, रॅली, व्याख्यान, पोस्टर्स, काव्य वाचन अशा माध्यमातून झाडे लावून ती जगवण्याचे महत्व, प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यायी कापडी व कागदी पिशव्या वापरणे, प्लास्टिक कचरा जमा करून रिसायकलिंग साठी पाठवणे, फुलपाखरे, कीटक यांना हानी न पोचवणे, रासायनिक खते, किडनाशके यांचा वापर कमी करण्याबाबत लोकांपर्यन्त माहिती पोचविणे अशा उपक्रमांतून मुले पर्यावरण संवर्धनास हातभार लावत आहेत. सारोळा, दिवळे, कांबरे, करंदी, मोहरी, कासुर्डी, इंगवली, भोलावडे, आळंदे आदी ३८ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून माधुरी उंबरकर, शुभांगी घाडगे, जयश्री वाल्हेकर, निकिता निगडे, निकिता आवाळे, मयुरी पवळे, अबोली पडवळ या रचना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमात मोलाचा पुढाकार घेतला आहे.

Advertisement

या कार्यक्रमाबद्दल बोलताना संस्थेचे समन्वयक श्रीपाद कोंडे व माधुरी उंबरकर यांनी सांगितले कि, ” पर्यावरण रक्षण ही आता जागतिक समस्या बनली आहे. देशादेशांच्या सरकारांनी त्यासाठी ठोस धोरण ठरवून पर्यावरण कायद्याची कडक अंमलबजावणी करायला हवी, परंतु त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाने देखील त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, लहान मुलांपासूनच ही जनजागृती करण्याची गरज आहे. म्हणून रचना संस्था शालेय मुलांना या विषयावर सज्ञान व सक्षम करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page