न्हावी ३२२ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवजी भालेराव यांची बिनविरोध निवड
न्हावी : भोर तालुक्यातील न्हावी ३२२ येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी शिवजी बापूराव भालेराव यांची आज शनिवारी(दि. ३१ ऑगस्ट) बिनविरोध निवड झाली. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच उर्मिला दत्तात्रय कारळे होत्या. गेल्या काही दिवसांपासून उपसरपंचपदाचे पद रिक्त होते. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. यावेळी शिवाजी भालेराव यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका उपाध्यक्ष अजय कांबळे यांच्यावतीने भालेराव यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्रामसेवक विजय कुलकर्णी, शीतल सोनवणे, अनिता सोनवणे, संदीप सोनवणे, विजय सोनवणे, गणेश सोनवणे, मिलिंद तारू, महादेव वेदपाठक, शिपाई संजय सोनवणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.