पहिले लग्न झाल्याचे लपवून दुसरा संसार मांडला, तिचाही हुंड्यासाठी छळ केला; अखेर राजगड पोलीसांनी पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल केला
खेड शिवापूर : पहिले लग्न झाले असतानाही अविवाहित असल्याची माहिती दिली. त्याआधारे सोयरिक झाली. थाटामाटात विवाह पार पडला. मात्र विवाहानंतर वैवाहिक जीवनातील काही वैयक्तिक कारणांवरून दोघांत भांडणे होऊ लागली. तसेच दुसऱ्या पत्नीला शारीरीक मानसिक त्रास देऊन माहेरहुन पैसे आणण्यासाठी पतीसह त्याचे आई वडील, बहीण व बहीणाचा नवरा छळ करू लागले. यानंतर पीडित तरुणीने थेट माहेर गाठून पतीसह सासरच्यांच्या विरोधात राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून फसवणूक करणाऱ्या तिच्या पती व नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवरा अजिंक्य बंडु कुटे(वय ३३ वर्ष), सासरा बंडु धोंडु कुटे(वय ६१ वर्ष), सासु भारती बंडु कुटे(वय ५५ वर्ष), तिघेही रा. तुंगार्ली लोणावळा(ता.मावळ), तसेच नणंद प्रज्ञा मंगेश दळवी(वय ३७ वर्ष), नणंदेचा नवरा मंगेश शंकर दळवी(वय 37 वर्ष) दोघेही रा.भांगरवाडी लोणावळा(ता.मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, २४ मे २०२३ रोजी रितीरिवाजानुसार संबंधित पीडित तरुणीचे अजिंक्यु कुटे याच्या बरोबर थाटामाटात लग्न झाले. यावेळी त्याने त्याच्यातील शारीरीक कमजोरी लपवुन तरुणीची फसवणुक केली व माझ्यावर उपचार चालु असल्याचे सांगत वेळ मारुन नेली. या दरम्यानच्या काळात नवरा अजिंक्य याच्यासह सासरे, सासु, नणंद व नणंदेचा नवरा यांनी पुजा हिला “माहेरहुन पैसे घेऊन ये तुझे आई वडीलांना प्रॉपर्टी मधील २५ टक्के हिस्सा माग” असे म्हणुन छळ केला.
नणंदेच्या नवऱ्यानेही केला विनयभंग
दरम्यानच्या काळात नणंदेचा नवरा मंगेश दळवी याने वाईट हेतुने नजर ठेऊन विनयभंग करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच सासरच्या या सर्वांनी शारीरीक व मानसिक छळ करुन वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करुन त्रास दिल्या नंतर या तरुणीने माहेरी येऊन या बाबत राजगड पोलिस ठाण्यात या सर्वांच्या विरुध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी या मध्ये नणंदेचा नवरा मंगेश दळवी याच्यावर विनयभंग तर सासरच्या व्यक्ती विरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आदी गुन्हे दाखल केले आहेत.
अजिंक्य कुटेने आळंदी येथे केलेले पाहिले लग्न दुसऱ्या पत्नी पासून लपवून ठेवल्याचे उघड
काही दिवसांनंतर तपास करताना अजिंक्य कुटे याने या लग्ना आगोदरच १८ जानेवारी २०२२ रोजी आळंदी येथे एक लग्न केले असुन ही बाब दुसरी पत्नी व तिच्या आई वडीलां पासुन लपवुन ठेवली असल्याचे उघड झाले. त्या बाबत राजगड पोलिसांनी त्याच्या विरोधात वाढीव कलम ४९४ लावुन अजुन एक गुन्हा दाखल केला असल्याची माहीती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी दिली आहे.