BIG BREAKING : हातवे मृत्यू प्रकरण; अपघात नसून खून?, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नसरापूर : रात्रीच्या सुमारास घरी परतत असणाऱ्या हातवे खु.(ता. भोर) येथील गणपत गेनबा खुटवड(वय ५२ वर्ष, रा. हातवे खु., ता. भोर) यांचा मृतदेह हातवे बु. येथील गुंजवणी नदीच्या बंधाऱ्याखाली रविवारी(दि. २२ सप्टेंबर) रात्री साडे अकराच्या सुमारास आढळून आला होता. याबाबत राजगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु हा घातपात असल्याचा संशय ग्रामस्थांकडून वर्तविण्यात आला होता. आता याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. स्वप्नील उर्फ बंटी ज्ञानोबा खुटवड(रा. हातवे खुर्द, ता भोर) या तरुणाने हा खून केला असल्याबाबत संदीप अरूण खुटवड(वय ४० वर्ष, रा. हातवे खुर्द, ता भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत संशयित स्वप्नील उर्फ बंटी ज्ञानोबा खुटवड यांस राजगड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी करीत आहेत.