भोर मधील आर्यन्स मार्शल आर्ट असोसिएशन इंडिया कराटे क्लासची उत्तुंग भरारी
भोर : साल २०२४ च्या अखिल भारतीय खुल्या कराटे स्पर्धेचे नवी मुंबई येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ३० टीमने सहभाग घेतला होता. त्यात भोर येथील आर्यन्स मार्शल आर्ट्स कराटे मधील १८ विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. सिहान शिवाजी ढवळे यांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते. काता(कटास) व कुमिते(फाईट) यामध्ये सर्व १८ विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोन मेडल्स मिळवले. असे एकूण ३६ मेडल विद्यार्थ्यांनी प्राप्त करत उत्कृष्ट टीम ची ट्रॉफी मिळवली.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे
ऋषिता उदय कोंढाळकर, सानवी उदय कोंढाळकर, स्वर्णीमा संदीप तनपुरे, सुप्रिया संतोष सुतार, श्रेया महेश सणस, शुभ्रा संतोष निकम, अनुष्का सुरेश माने, सार्थक संदीप मरगजे, शंभूराजे राजकुमार काळे, सिद्धार्थ हनुमंत कंक, अभ्युद्य अजित कंक, यश विजय आवळे, स्वराज संजय आलगुडे, तनिष्क उमाजी खाटपे, श्रवण अतुल खोपडे, प्रथमेश सुरेश माने, ओम नितीन कळसकर, सोहम रवींद्र खोपडे
या सर्व विद्यार्थ्यांची पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना नवनाथ कांबळे, दिग्विजय थोपटे, अनिल राठोड, प्रतीक कंक, संस्थापक अध्यक्ष सोमनाथ शंकरराव ढवळे या शिक्षकांनी प्रशिक्षण दिले. सर्व शिक्षकांनी मिळून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.