भोर शहरात नोंदणी केलेल्या नागरिकांना किरण दगडे पाटील युवा मंच तर्फे उद्या दिवाळी किराणा साहित्य वाटप; अभिनेते प्रवीण तरडे राहणार उपस्थित
भोर : किरण दगडे पाटील युवामंचच्या माध्यमातून गेली ९ वर्ष अनेक विधायक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यादरम्यान किरण दगडे पाटील युवामंचने अजून भर टाकत भोर-राजगड-मुळशी मधील नागरिकांसाठी दिवाळी फराळ साहित्य वाटप उपक्रम हाती घेतला आहे.
यावेळी नावं नोंदणी करण्यासाठी नागरिकांची तीनही तालुक्यात मोठी झुंबड उडालेली पहायला मिळाली. या उपक्रमासाठी नाव नोंदणी करण्याचे काम दिनांक २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत भोर तालुक्यातील कापूरहोळ मधील साईस्पर्ष बिल्डिंग येथील कार्यालय तसेच भोर शहरातील राजवाडा चौक येथील कार्यालय अशा २ ठिकाणी घेण्यात आले.
त्यातील भोर शहरातील कार्यालयात नावनोंदणी झालेल्या नागरिकांसाठी उद्या रविवारी(दि. ६ ऑक्टोबर) भोर मधील राजा रघुनाथराव विद्यालय प्रांगणात सायंकाळी ४ वाजता दिवाळी फराळ साहित्य वाटप होणार असून या कार्यक्रमासाठी अभिनेते प्रवीण तरडे देखील उपस्थित राहणार असल्याचे किरण दगडे पाटील युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.