भोरचे मूळ ग्रामदैवत वरची वाघजाई माता येथे नवरात्रोत्सवानिमित्त आदिशक्तीचा जागर …
भोर : किल्ले रोहिडेश्वर (विचित्रगड) शेजारी खूप पूर्वी पासून वाघजाई मातेचे मंदिर आहे. त्यास वरची वाघजाई माता मंदिर असे संबोधले जाते.वाघजाई माता ही अरण्य देवता आहे.यामुळे वाघजाई मातेचे मंदिर कोणत्याच गावात आढळत नाही. ते अरण्यात किंवा दुर्गम अशा डोंगराळ भागात च आढळते. पूर्वी छोटे व मजबूत असे देवीचे मंदिर होते. गेली ५-६ वर्ष झाले मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे.मंदिर डोंगरावरती असल्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार करताना भोर च्या मावळ्यांचे,तरुणांचे,शिवप्रेमी संघटनांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले आहे. मंदिरा शेजारी विस्तीर्ण देवराई ची निर्मिती केली आहे. देवस्थानाला येण्यासाठी ३ ते ४ रस्ते आहेत. परिसरात प्राणी आणि पक्षी यांची पाणी पिण्यासाठी सोय केलेली आहे. या ऐतहासिक मंदिरात मोठ्या श्रध्देने भोरवासी व परिसरातील भाविक येतात. भोरचे मूळ ग्रामदैवत म्हणून या देवस्थानाची ओळख आहे. नवरात्री उत्सवानिमित्त वरची वाघजाई माता सेवा मंडळ भोर मोठ्या उत्साहाने आणि मनोभावाने नऊ दिवस सेवा करतात.नवरात्रोत्सवानिमित्त भजन,महाप्रसाद, होमहवन अष्टमी पूजा होणार आहे. भोर शहरा पासून हे मंदिर ४ किलोमिटर अंतरावर आहे. पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहचण्याकरिता साधारणतः एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो. आपण ही सर्वांनी या वरची वाघजाई माता मंदिराचे अवश्य दर्शन घ्यावे.