चिखलगाव पंचक्रोशीतील गावांना विकास कामांबरोबर नळपाणी पुरवठा, उपसा जलसिंचन व आरोग्य सेवा उपलब्ध केली – मा.आमदार संग्राम थोपटे
भोर : भोर तालुक्यातील आंबवडे भागातील मौजे चिखलगाव येथे आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकाम करणे रक्कम रू.७५ लक्ष, महादेव मंदिरा जवळ साकव बांधणे रक्कम रू.६० लक्ष यासह अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, कुस्ती आखाडा बांधणे, अंतर्गत गटार बांधणे, पाणीपुरवठा योजना करणे, सामाजिक सभागृह, सभा मंडप, साकव बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, स्मशानभूमी शेड बांधणे इत्यादी ४ कोटी २५ लक्ष रुपये निधीतून मंजूर केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाट्न मा. आमदार संग्राम थोपटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की या भागातील प्रत्येक गावात अनेक कोट्यावधी रुपये निधीतून विकास कामे मार्गी लावण्यात आली. चिखलगाव येथील ग्रामस्थ मंडळी विशेष करून स्व.सुखदेव कुंभार, तसेच एकनाथराव गायकवाड, आनंदराव धोंडे पाटील यांनी याठिकाणी आरोग्य उपकेंद्र उभारण्यासाठी माझ्यासोबत पाठपुरावा केला त्यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होत आहे.
या प्रसंगी भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदा आंबवले, युवा नेते अनिल सावले, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष कोंढाळकर, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष संजय मळेकर, हरिभाऊ चिकणे, एकनाथ गायकवाड, आनंदराव धोंडे, पांडुरंग धोंडे, शंकरनाना धोंडे, दिनकर धनावडे, रघुनाथ धोंडे, किसनबुवा धोंडे, राजाराम धोंडे, अरविंद जाधव, मोहन जेधे, राजेंद्र खोपडे, शिवाजी नाटंबे, शिवाजी सासवडे, भाऊ परखंदे, सुनील जेधे, संतोष केळकर, सोपान तांगडे, शंकर रावडे, भाऊसो जाधव, अर्जुन दिघे, संदीप दत्वे, संतोष नवघणे, राजेंद्र निगडे, सर्जेराव कोंढाळकर, काका कण्हेरकर, संतोष खोपडे, चिखलगावचे सरपंच सुरेश धोंडे, उपसरपंच मनीषा कुंभार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार, पंचक्रोशीतील कोर्ले, वडतूंबी, टिटेघर, रावडी, कर्नावड व धोंडेवाडी, अडाचीवाडी, चिलखगांव येथील ग्रामस्थ, महिला व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.