राजगड पोलीस स्टेशनकडून जप्त केलेली बेवारस वाहने सोडवून नेण्याचे आवाहन
नसरापूर : राजगड पोलिस ठाण्याच्या आवारातील जप्त केलेली बेवारस दुचाकी वाहने ज्या वाहन चालकांची असतील त्यांनी आपली वाहने येत्या पाच दिवसात म्हणजेच दि. १३ मे पर्यंत सोडवून नेण्याचे आवाहन राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी केले आहे.
राजगड पोलिस स्टेशन अंकित शिंदेवाडी, खेडशिवापूर, किकवी तसेच नसरापूर बीट हद्दीतील विविध गुन्ह्यांच्या प्रकरणात जप्त करण्यात आलेली बेवारस स्थितीतील तसेच अपघाती दुचाकी वाहने बऱ्याच कालावधीपासून कामथडी(ता. भोर) येथे राजगड पोलीस ठाण्याच्या आवरत पडून आहेत. यामध्ये ६२ दुचाकी असल्याची राजगड पोलिस ठाण्याच्या रेकाँर्डवर नोंद आहे.
तरी, ही वाहने ज्या कुणाच्या मालकीची असतील त्यांनी वाहनाबाबत खात्री करून, स्वतःसह वाहनाची ओळख पटवून, मूळ कागदपत्रे आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपली वाहने पुढील ५ दिवसांत म्हणजेच दि. १३ मे पर्यंत ताब्यात घ्यावीत. विहित कालावधीमध्ये वाहने घेऊन न गेल्यास त्या वाहनांचा शासकीय पद्धतीने विल्हेवाट लावून ती भंगार मध्ये जमा केली जातील. त्यानंतर कोणाचाही तक्रार घेतली जाणार नसल्याचे आवाहन राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी केले आहे.