लाच घेताना पुण्यातील उपलेखापरीक्षक सासवड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…

सासवड :- सोमवार (दि.९) रोजी सासवड तहसीलदार कचेरीच्या कार्यालया समोर उपलेखापरीक्षक रवींद्र ज्ञानेश्वर गाडे (वय५१) यांना विकास सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवाकडून ८ हजार ५०० रुपये स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. रवींद्र गाडे यांच्यावर सासवड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की
तक्रारदार हे विकास सेवा सहकारी सोसायटी लि. दौंड येथे सचिव म्हणून नोकरी करतात. या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज देणे व कर्जाची वसुली करण्याची कामे केली जातात. शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली जास्त असेल तर शासनाकडून संस्थेला अनुदान दिले जाते. त्यासाठी तालुका ऑडिटर कडून लेखा परीक्षण करणे आवश्यक असते. तक्रारदार यांनी लेखा परीक्षण करण्याचा प्रस्ताव रवींद्र गाडे यांच्या कडे दिला होता. गाडे यांनी तक्रारदार यांच्या संस्थेचा सन २०२०-२१ व २०२१-२२ वर्षांचे सक्षमी करनाच्या प्रस्तावावरील शिफारशी करिता १० हजार रुपये लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसिबी कडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीची ६ ऑक्टोबर रोजी पडताळणी केली असता रवींद्र गाडे याने लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून गाडे याला तक्रारदार यांच्याकडुन ८ हजार ५०० रुपये लाच स्वीकारताना रांगे हाथ पकडण्यात आले.
याबाबत पुढील तपास पुणे एसिबी चे पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत. ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसिबी च्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page