मोबाईल न दिल्यामुळे देहू येथील १५ वर्षीय मुलीने संपविले जीवन
पुणे : पुण्यातील देहू येथील अभिलाषा हाउसिंग सोसायटी येथे गणेश सावंत हे गृहस्थ राहतात. गणेश सावंत हे मूळचे सांगोला येथील आहेत. परंतु ते कामानिमित्त देहूत राहत आहेत. ते आणि त्यांची पत्नी दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. गणेश सावंत यांना २ मुली होत्या. त्यात आर्या मोठी मुलगी होती. बुधवारी (दि.११) रात्री जेवण झाल्यानंतर आईकडे मोबाईल मागितला. मात्र आईने मोबाईल देण्यास नकार दिला. मोबाईल दिला नाही म्हणून दहावीत शिकणाऱ्या आर्याने टोकाचा निर्णय घेतला. या मुलीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले.तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शविच्छेदन करून मृतदेह आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आला. ही घटना देहू येथे बुधवारी (दि.११) रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.